Indian Railways News => Topic started by sushil on Jun 09, 2013 - 00:02:27 AM


Title - वांगणीजवळ रेल्वे रुळाला तडे
Posted by : sushil on Jun 09, 2013 - 00:02:27 AM

वांगणी

वांगणीजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणा-या सर्व गाड्या सकाळी थांबवण्यात आल्या होत्या. इंद्रायणी एक्सप्रेस तासभर वांगणी स्टेशनवरच थांबवण्यात आली होती. अखेर रेल्वेच्या तंत्रज्ञांनी रुळांची दुरुस्ती केली आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली. या आठवड्यात कर्जत-छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) दरम्यान मध्य रेल्वेच्या रुळाला तडे जाण्याची ही तिसरी घटना आहे.